अहमदनगर - राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 9, 2020

अहमदनगर - राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

मुंबई येथील राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.

अहमदनगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहाप्रती असंख्य बहुजनांची अस्मिता आहे. याठिकाणी दोन अज्ञात व्यक्तिंनी हल्ला करून राजगृहावरील काही वस्तूंची तोडफोड केली. या प्रकार अतिशय निंदनीय असून सदर बाब अतिशय गंभीर असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. राजगृहावर कायमस्वरूपी 24 तास पोलीस तुकडीचा बंदोबस्त द्यावा, आंबेडकर कुटुंबीयांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा महासचिव सुनील शिंदे, भारिपचे युवक जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, विनोद गायकवाड, दिलीप साळवे, सिद्धार्थ घोडके, आकाश जाधव, अक्षय भिंगारदिवे, गौरव पंडित यांसह अनेक जन उपस्थित होते


प्रतिनिधी - गणेश राठोड, अहमदनगर

No comments:

Post a Comment