नेवासा - वडाळा बहिरोबा, जैनपूर करोनाचा शिरकाव तर घोडेगाव येथील रुग्णाचे निधन. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 30, 2020

नेवासा - वडाळा बहिरोबा, जैनपूर करोनाचा शिरकाव तर घोडेगाव येथील रुग्णाचे निधन.

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा, जैनपूर करोनाचा शिरकाव तर घोडेगाव येथील रुग्णाचे निधन.

 नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे पहिला करोना बाधीत आढळला आहे. यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. | C24Taas |या बाधित व्यक्तीला नेवासा येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वडाळा गावात पहिला करोना बाधित रुग्ण सापडल्याने आज दुपारनंतर गाव बंद करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. | C24Taas | 
मागील आठवड्यात घोडेगाव येथील एका रुग्णाचा रिपोर्ट खाजगी लॅब मधून पाॅझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नगरला उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणाही झाली होती मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. | C24Taas | तसेच जैनपूर येथे एक व्यक्ती करोना बाधीत आढळून आली आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्क व घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Group 👇

शंकर नाबदे, सी 24 तास नेवासा. मो.9960313029

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:

Post a Comment