तुळजापूर उस्मानाबाद -सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, July 28, 2020

तुळजापूर उस्मानाबाद -सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

कळंब तालुक्यातील शिराढोण येथे राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठाण आयोजित सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन


कळंब तालुक्यातील शिराढोण येथे राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान आयोजित सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 29 जुलै रोजी  अर्सेनिकम 30 या गोळ्यांचे औषधांचे,मोफत वाटप करण्यात येणार आहे, तसेच वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे, माननीय अजित पिंगळे तालुका अध्यक्ष भाजप कळंब, रामहरी शिंदे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब, पंडितराव टेकाळे व चेअरमन डीसीसी बँक यांच्या उपस्थितीत वाटप केले जाणार आहे. कळंब तालुक्यात  कोरोणा चा संसर्ग वेगाने वाढत आहे, त्यामुळेच एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. अनलॉकची प्रक्रिया चालू झाली असल्याने आपल्या दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणे अनिवार्य झाले असल्याने, कोरोणा ची साखळी तोडणे हे आपल्यासमोरील प्रमुख आव्हान आहे, सर्वानी सजग राहून आपली दैनंदिन कामे करावीत बाहेर पडताना मास्क अथवा रुमालाचा वापर करावा दोन व्यक्तीत सहा फूट अंतर राखावे वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन राणा जगजितसिंह पाटील युवा  प्रतिष्ठानचे कळंब तालुका सचिव किरण पाटील यांनी केले आहे.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

No comments:

Post a Comment