सीबीएसई बोर्ड परीक्षेत 'परिक्रमा' पब्लिक स्कूल चा १०० टक्के निकाल. ९८ टक्के गुण मिळवून दिशा ताथेड प्रथम - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 19, 2020

सीबीएसई बोर्ड परीक्षेत 'परिक्रमा' पब्लिक स्कूल चा १०० टक्के निकाल. ९८ टक्के गुण मिळवून दिशा ताथेड प्रथम

सीबीएसई बोर्ड परीक्षेत 'परिक्रमा' पब्लिक स्कूल चा १०० टक्के निकाल.
९८ टक्के गुण मिळवून दिशा ताथेड प्रथम


 श्रीगोंदा प्रतिनिधी: श्रीगोंदासीबीएसई परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या ई. १० वि च्या निकालात 'परिक्रमा' शैक्षणिक संकुलातील 'परिक्रमा' पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादित केले. परंपरेनुसार शाळेचा निकाल १००% लागला असून यावर्षी देखील मुलींनी निकालामध्ये आघाडी घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यातून या शाळेची विद्यार्थिनी कु. दिशा ताथेड हिने ९८% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. उत्कर्षा सावकारे (९६%) आणि कु. नेहा पाचपुते (९४%) गुण मिळवून शाळेत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. तसेच कु. दिशा ताथेड व कु. उत्कर्षा सावकारे हिने समाज शास्त्र व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. परिक्रमा पब्लिक स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याबरोबरच अष्टपैलू विद्यार्थी घडविण्याचे काम करत राहते. शाळेतील शिक्षक सर्व विषयांच्या नोट्स देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या शंकेचे वैयक्तिकरित्या निरसन करतात. सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये सुद्धा शाळेने ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून प्रत्येक वर्गाचा व्हॉटसअप ग्रुप करून विद्यार्थ्यांना नोट्स व व्हिडिओ लेक्चर्स देऊन त्यांचे प्रशिक्षण सुरू ठेवले आहे. अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे परिक्रमा पब्लिक स्कूलने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. विद्यार्थ्यांसाठी घोड सवारी, स्विमिंग व २० प्रकारचे विविध मैदानी खेळांचा व तज्ज्ञ प्रशिक्षकांचा येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून सामवेश करणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते, संचालक प्रतापसिंह पाचपुते व प्राचार्य जेम्स व्हॅन मैनेन यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिनिधी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले

1 comment:

 1. Congratulations to all students and Teachers team.!!
  Great achievement.
  Utkarsha sawakare,we are proud of you.
  Well done.
  Keep it up.

  ReplyDelete