आण्णाभाऊ साठे यानां भारतरत्न पुरस्कार द्या,लहुजी शक्ती सेनेची निवेदनाद्वारे मागणी - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, July 28, 2020

आण्णाभाऊ साठे यानां भारतरत्न पुरस्कार द्या,लहुजी शक्ती सेनेची निवेदनाद्वारे मागणी

आण्णाभाऊ साठे यानां भारतरत्न पुरस्कार द्या,लहुजी शक्ती सेनेची निवेदनाद्वारे मागणी


तुळजापूर उस्मानाबाद प्रतिनिधी:  जगतविख्यात साहित्यिक आण्णाभाऊ साठे याना त्यांच्या शताब्दी निमित्त मरणोत्तर भारतरत्न हा सन्मान पर पुरस्कार देण्यात यावा..अशी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याकडे(दि.२७)रोजी लेखी निवेदन देऊन म्हटले आहे. की,साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे साहित्याची रशिया सारख्या देशाने दखल घेतली.संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात अनेक कादंबऱ्या,कथा,चित्रपटकथा,लोकनाट्य, पोवाडे, प्रवास वर्णन आदी वास्तव लिखाण जगासमोर ठेवले आहे.सन.२०२० हे वर्ष आण्णाभाऊ साठे यांचे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा.असे आशयाचे तहसील मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानां निवेदन देऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा,अशी विनंती केली आहे. निवेधनावर लहुजी शक्ती सेना तुळजापूर तालुकाध्यक्ष किसन देडे,सोसेल मिडीया तालुका ध्यक्ष संजय गायकवाड, विध्यार्थी आघाडीचे अमोल सगट,आकाश शिंदे,दत्ता कांबळे,संदिप सिरसट,शाम कंबळे आदींच्या सह्या आहेत. 

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

No comments:

Post a Comment