स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद यांच्या विद्यमाने हिमालया प्रोडक्ट्सचे वाटप - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 9, 2020

स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद यांच्या विद्यमाने हिमालया प्रोडक्ट्सचे वाटप तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी आणि सराटी येथील गावात प्रत्येकी १० याप्रमाणे २० कुटुंबाना हिमालयाचे बेबी प्रोडक्ट्स वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमध्ये गरीब कुटुंबाला मदत करण्यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोग व सखी रिटेल प्राईड लिमिटेड या दोघाच्या प्रयत्नातून हिमालय कंपनीने प्रोडक्ट्स देऊन सहकार्य केले. याचे कारण कोरोना महामारीमुळे महिलांना बाजारात जाऊन प्रोडक्ट्स  खरेदी करणे शक्य नव्हते, म्हणून आयुर्वेदिक प्रोडक्ट्स  बेबी क्रीम, पावडर ,मालिश तेल ,साबण, हगीज,हे आयुर्वेदिक प्रोडक्ट्सचे किट लीडर महिला तसेच तालुका समन्वयक हस्ते वाटप करण्यात आले. हे किट वाटप करताना सामाजिक अंतर ठेवून तसेच तोंडाला मास्क लावून या गोष्टीची काळजी घेऊन देण्यात आले. सखी अन्न सुरक्षा शेती प्रकल्पाच्या प्रोजेक्ट मॅनेजर तब्बसुम मोमीन तालुका समन्वयक शीला भोजने व माधुरी जुगदार तसेच गाव पातळीवर काम करणाऱ्या सवांद सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

No comments:

Post a Comment