दुधप्रश्नी नेवासा बस स्थानक परिसरात आज शनिवार १ ऑगस्ट रोजी रस्तारोको. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 31, 2020

दुधप्रश्नी नेवासा बस स्थानक परिसरात आज शनिवार १ ऑगस्ट रोजी रस्तारोको.

दुधप्रश्नी नेवासा बस स्थानक परिसरात शनिवार १ ऑगस्ट रोजी रस्तारोको.
नेवासा - शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी राज्य सरकारच्या विरोधात दि. १ ऑगस्ट रोजी नेवासा शहरात रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली.
     दुधाला ३० रुपये हमी भाव मिळालाच पाहिजे,दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर १० रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे,अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे,दुधाला पूर्वी ३० पैसे डिडक्शन होते ते आज एक रुपया केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे,ते डिडक्शन ताबडतोब ३० पैसे करा
    आदी मागण्यांसाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनात दूध उत्पादक सहभागी होणार असल्याचे दिनकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment