अहमदनगर - रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराने बरबटल्यांच्या माथी पाप टाकणार - उपनेते अनिल राठोड - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, July 14, 2020

अहमदनगर - रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराने बरबटल्यांच्या माथी पाप टाकणार - उपनेते अनिल राठोड

अहमदनगर येथील तपोवन रस्ताच्या कामाची अधिकारी व शिवसेनेच्या मार्फत तपासणी
रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराने बरबटल्यांच्या माथी पाप टाकणार - उपनेते अनिल राठोड

अहमदनगर - तपोवन रेस्ता अनेक वर्षापासून दुरावस्थेत होता. या रस्त्याचे काम व्हावे म्हणून शिवसेनेने वारंवार आंदोलने करून पाठपुरावा केला. त्यामुळे मुख्यमंत्री निधीतून हा रस्ता मंजूर होवून ३.५ कोटींचा निधीही मंजूर झाला. या मोठ्या निठीतून दर्जेदार व या भागाचे वैभव वाढवेल असा रस्ता होणे अपेक्षित आहे. मात्र या ठेकेदाराने कामात मोठा भ्रष्टाचार करून जनतेच्या पैश्याची लुट चालवली आहे. जनतेच्या पैश्याची लुट शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या निधीतून हा रस्ता होत असल्यने जो पर्यंत हा तपोवन रस्ता पूर्ण उखडून परत पहिल्या पासून या रस्त्याचे काम सुरु होत नाही तोपर्यंत शिवसेना शांत न बसता अनेकदा आंदोलने करणार आहे. शिवसेनेच्या तक्रारीची दखल घेत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पुणे कार्यालयाने या कामाची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यास सुरु केली आहे. त्यामुळे या कामात झालेला भ्रष्टाचार लवकरच जनते समोर येईल. ज्यांचे ज्यांचे हात या कामांत भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांच्याच माथी हे पाप आम्ही टाकणार आहोत, असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी दिला.

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होत असलेल्या तपोवन रस्ताच्या कामांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी करत कामची चौकशी व तपासणी करण्याची तक्रार सरकार कडे केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, पुणे कार्यालयाने या कामाची चौकशी व दर्जाची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी (नागपूर) यांनी आज सकाळी तपोवन रस्त्याची पूर्ण पाहणी करून दर्जाची, वापरलेल्या डांबराची, खडीकरणा ची तपासणी उपनेते अनिल राठोड यांच्या समवेत केली. रस्त्याची झेलली दुरावास्ता दाखवतांना संतप्त झालेले राठोड यांनी यावेळी अधिकारींना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकक्ष अभियंता पेशवे, माजी महापौर अभिषेक कळमकर, जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, दिगंबर ढवण, गिरीश जाधव, उपशहर प्रमुख डॉ. चंद्रकांत बारस्कर, अशोक कातोरे, विक्रम राठोड, अनिकेत कराळे, आदींसह स्थानीक नागरिक उपस्थित होते. यावेळी ठीकठिकाणी रस्ता खोदुन वापरण्यात आलेल्या मटेरियलची तपासणी सर्व अधिकारींनी केली. रत्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला आहे, रस्त्याचे डांबर हाताने निघत आहे आदि बाबी अभिषेक कळमकर, आनंद लहामगे यांनी यावेळी अधिकारींच्या निदर्शणास आणून दिल्या. दिगंबर ढवण यांनी ठीक ठिकाणी रस्त्याची झालेली दुरवस्था दाखवली.
अनिल राठोड पुढे म्हणाले, औरंगाबाद व मनमाड या प्रमुख रस्त्यांना जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. या भागात मोठ्याप्रमाणात वस्ती वाढत असल्याने या भागातील नागरिक वारंवार माझ्याकडे या रस्त्याच्या कामा बाबत तक्रारी करत आहेत. या भागातील शिवसनेचे दिगंबर ढवन या रत्याच्या कामावर बारीक लक्ष ठेऊन आहेत. शहराचे वैभव वाढवणारा हा रस्ता जर अशा पद्धतीने खालच्या दर्जाचा झाला तर शिवसेना या कामचा विरोध करत आहे. वर शिवसेनेचे मुख्यमंत्री बसलेले आहेत. त्यामुळे अधिकारींनी कोणाच्या ही दाबावाला बळी न पडता या झेलेल्या निकृष्ट कामाची तपासणी करावी. या संदर्भात मी मुख्यमंत्रींकडे पत्रव्यवहार करत आहे.
नागपूर हून आलेले वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी यांनी २० जुलै पर्यत या कामची संपूर्ण तपासणी करणार आहोत व अहवाल वर पाठवणार आहोत असे यावेळी सांगितले.

प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर

No comments:

Post a Comment