स्वताःचा जीव धोक्यात घालून जनसामान्यांसाठी झटणारे पोलीसच खरे कोव्हीड योद्धा -अ‍ॅड. संगिता चव्हाण - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, July 28, 2020

स्वताःचा जीव धोक्यात घालून जनसामान्यांसाठी झटणारे पोलीसच खरे कोव्हीड योद्धा -अ‍ॅड. संगिता चव्हाण

स्वताःचा जीव धोक्यात घालून जनसामान्यांसाठी झटणारे पोलीसच खरे कोव्हीड योद्धा -अ‍ॅड. संगिता चव्हाण

मुख्यमंत्री ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पोलीसांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप 


बीड(प्रतिनिधी): कोणतेही भय न बाळगता कोणत्याही अडअडचणींना समोर जाऊन जनसेवा करण्यासाठी कायम कटिबद्ध राहणारे एकमेव म्हणजे पोलीस प्रशासन असते. सध्या सर्वत्र कोरोनाच्या विषाणुने हाहाकार घातला आहे. या हाहाकाराला रोखण्यासाठी कायम स्वताःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उभेवुन सामान्यांच्यासाठी ऊन,वारा,पाऊस पेलत काम करणारे पोलीस प्रशासनच खरेखुरे कोव्हीड योद्धा असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी केले
शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्याकडून  पोलीस अधिक्षक कार्यालयामध्ये पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक वियज कबाडे यांच्या हस्ते पोलीस कर्मचारी योध्दांना सॅनिटायझर व मास्कटचे वाटप  करण्यात आले. यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले की, कुठल्याही सन, वार असला की जनसेवेसाठी कायम तत्पर्य हावून काम करणारे बीडचे पोलीस प्रशासन आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्याच्या सिमा सिल करत त्यावर कडक बंदोबस्त करणारे हेच खरेखुरे योद्धे आहेत. आज प्रत्येक जण आपला जीव वाचविण्यासाठी घरामध्ये स्वताःला कैद करून ठेवत आहे. परंतू यामध्येही सर्वसामान्य माणसांची काळजी करत त्यांच्या जीवनाला धोका होवून नये म्हणून आपला जीव धोक्यात घालून कायम रस्त्यावर राहत लोकांच्या जीवासाठी काम करणारे पोलीसच खरे कोव्हीड योद्धा असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी केले. यावेळी पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, शिवसेनो महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख  फरजाना शेख, उपजिल्हा प्रमुख शांता राऊत, सारिका काळे, सारिका डोंगरे यांच्याह सोशल डिस्टंशिगचे नियम पाळत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

बीड प्रतिनिधी औसारमल गौतम सह
नन्नवरे कृष्णाNo comments:

Post a Comment