अहमदनगर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - पालकमंत्री मुश्रीफ - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, July 24, 2020

अहमदनगर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही - पालकमंत्री मुश्रीफ

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असले, तरी ते बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोविड या महामारीविरुद्ध लढण्यास सज्ज आहे. प्रशासनाकडून लॉकडाऊनची गरज नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तूर्तास लॉकडाऊनचा कोणताही निर्णय घेता येणार नसल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री मुश्रीफ यांनी हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यानंतर लॉकडाऊन तूर्तास होणार नसल्याचे पत्रकारांना सांगितले.

No comments:

Post a Comment