कोरोनाशी लढा देतांना परिचारिका कोरोना योद्धा शहिद रूग्णालयासह जिल्ह्यात हळहळ; रूग्णालय परिसरामध्ये कर्मचार्‍यांची श्रद्धांजली - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, July 21, 2020

कोरोनाशी लढा देतांना परिचारिका कोरोना योद्धा शहिद रूग्णालयासह जिल्ह्यात हळहळ; रूग्णालय परिसरामध्ये कर्मचार्‍यांची श्रद्धांजली


कोरोनाशी लढा देतांना परिचारिका कोरोना योद्धा शहिद

रूग्णालयासह जिल्ह्यात हळहळ; रूग्णालय परिसरामध्ये कर्मचार्‍यांची श्रद्धांजली
बीड (प्रतिनिधी):गेल्या ३६ तासात बीडमध्ये कोरोनाचे पाच बळी
बीड जिल्ह्यात समुह संसर्ग वाढत चालल्याने कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून गेल्या दोन दिवसात कोरोना बाधितांचा मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या ४० वर्षीय परिचारिका कोरोना बाधित होवून धारातिर्थ पडल्याने बीड जिल्हा रूग्णालयातच नव्हे तर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून बीड जिल्ह्यात कोरोना योद्ध्याचा हा पहिला मृत्यू आहे. आज सकाळी जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्‍यांनी रूग्णालयाच्या बाहेर येवून साश्रुनयनांनी कोरोनासारख्या अदृश्य शत्रुशी लढा देत खर्ची पडलेल्या आपल्या साथीदाराला श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेकांना रडू कोसळले तेंव्हा रूग्णालय परिसरातील वातावरण हळवे झाले होते. आज सकाळी सदरील परिचारिकेसह अन्य एक ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या ३६ तासात पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून अन्य एका वृद्ध महिलेची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.

बीड प्रतिनिधी औसरमल गौतम सह
नन्नवरे कृष्णा

No comments:

Post a Comment