शिक्रापूर - ग्रामपंचायत प्रशासक निवडीला आण्णा हजारे यांचा विरोध - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, July 20, 2020

शिक्रापूर - ग्रामपंचायत प्रशासक निवडीला आण्णा हजारे यांचा विरोध


प्रतिनिधी .【सुनिल पिंगळे शिक्रापूर पुणे】


ग्रामपंचायत प्रशासक निवडीला आण्णा हजारे यांचा विरोध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र..तर  आंदोलनाचा इशारा

                 राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्यावा असे परिपत्रक काढले आहे. पंरतु हा निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांचाच गृहपाठचं कच्चा असुन  कायद्याची पायमल्ली करून "घटनाबाह्य" निर्णय घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे अशी नाराजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी दिला आहे
         पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की ग्रामविकास विभागाने 14 जुलै 2020 रोजी एक परिपत्रक काढुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर जिल्हाच्या  पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करावी ,असे म्हटले आहे पालकमंत्री ज्या पक्षाचे असतील ,ते त्याच्याच पक्षाच्याचं व्यक्तींची नावे सुचविणार त्यामुळे राज्यात पक्षाची,पक्षाने,पक्ष सहभागातून चालविलेली शाही येऊन "लोकशाही" पायदळी तुडविली जाणार हे स्पष्ट होते आहे म्हणून या प्रक्रियेला विरोध आहे
   
 'त्या' त पालकमंत्र्यांचे नाव दाखवाचं

 तर पुढे जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी कायद्यावर बोट ठेवत ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र "ग्रामपंचायत अधिनियमाचा" उल्लेख केला आहे त्या अधिनियमामध्ये पालकमंत्र्यांचे नाव कुठे आहे ते कृपया शासनाने जनतेला दाखवावे अधिनियमामध्ये पालकमंत्र्यांचा उल्लेख कुठेही नाही असुच शकत नाही त्यामुळे ग्रामविकास विभागाने काढलेले पत्रक राज्यातील जनतेची "दिशाभूल" करणारे असुन "बेकायदेशीर" आहे हे यातुन स्पष्ट होत आहे असे आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री यांना दिलेले  पत्रात नमूद केले आहे त्यामुळे हि  निवड प्रक्रिया  नियमबाह्य असल्याची माहिती मिळते असुन याविरोधात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आंदोलानाचा इशारा "ठाकरे सरकाराला" दिला असुन  यावर ठाकरे सरकार काय भुमिका  घेत आहे हे येणारा "काळाचं" ठरवले...? अन्यथा न्याय हक्कासाठी लोकाशाही मार्गाने आंदोलन नक्कीचं होईल.

No comments:

Post a Comment