पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, July 16, 2020

पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली.
     
पारनेर - तालुक्यातील कोरोनाची संख्या दिवसभरात वाढताना दिसत आहे सकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संध्याकाळपर्यंत पुन्हा चार जणांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले ची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
सकाळी धोत्रे दोन ढवळपुरी फाटा एक यानंतर सिद्धेश्वर वाडी येथील दोन सोबलेवाडी एक  व खडकवाडी येथील एक जनाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे तालुक्यात दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या सात वर गेली आहे हा एका दिवसातील उच्चांकी आकडा आहे त्यामुळे कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे.
सिद्धेश्वर वाडी येथील तीन जण हे यापूर्वी बाधित असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत त्यामुळे सिद्धेश्वर वाडी सोबलेवाडी हे गाव तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच खडकवाडी हे गाव देखील तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.
  दरम्यान पाडळी आळे 1 शिरापूर 1 पळसपुर 8 खडकवाडी 10 म्हसणे 7 नांदूर पठार 1 पारनेर 2 पळशी 5 लोणीमावळा 1 बुगेवाडी 1 वासुंदे 1 सिद्धेश्वर वाडी 13 सुपा 2 असे दिवसभरात 53  अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

No comments:

Post a Comment