अहमदनगर - तब्बल १४ दिवसांनंतर शहरातील बाजारपेठ झाली खुली. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 12, 2020

अहमदनगर - तब्बल १४ दिवसांनंतर शहरातील बाजारपेठ झाली खुली.

अहमदनगर - तब्बल १४ दिवसांनंतर शहरातील बाजारपेठ झाली खुली ; आडतेबाजार परिसराचा कन्टेन्मेंट झोनचा कालावधी संपुष्टात


अहमदनगर- नगर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कापड बाजार , गंज बाजार , मोची गल्ली आडते बाजार , दाळमंडई परिसरातील कन्टेन्मेंट आणि बफर झोनचा कालावधी रविवारी ( दि . १२ ) रात्री १२ वाजता संपुष्टात आल्याने या बाजार पेठेतील दुकाने सोमवारी ( दि .१३ ) सकाळी तब्बल १४ दिवसांनंतर उघडली आहेत . शहरात दुकानांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे . त्यामुळे आता दररोज या वेळेत बाजार पेठेचा परिसर गजबजलेला राहणार आहे . शहरातील घाऊक आणि ठोक विक्रीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या आडतेबाजार परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा परिसर १४ दिवस कन्टेन्मेंट झोन तर शनिगल्ली , झेंडीगेट , पोखरणा हॉस्पीटल सुभेदार गल्ली , नालबंदखुट , पिजार गल्ली पारशाखुट , जुना कापडबाजार , गंजबाजार , मोचीगल्ली , सारडागल्ली , कापडबाजार , शहाजीरोड , तांबटकरगल्ली , तेलीखुंट पॉवर हाउस , नालामस्जीद , स्मिता मेडीकल , तेलीखुट , सर्जेपुरा चौक , मनपा शाळा , बेलदार गल्ली , मक्का मस्जीद , जे.जे.गल्ली , कोंडयामामा चौक , राज चेंबर , कोठला . हा परिसर १२ जुलैच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बफर झोन घोषित करण्यात आला होता . त्यामुळे १४ दिवस बाजार पेठ बंद होती

प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर

No comments:

Post a Comment