अहमदनगर - सुरक्षकांच्या थकीत वेतनासाठी जिल्हा रुग्णालयाला निवेदन. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 12, 2020

अहमदनगर - सुरक्षकांच्या थकीत वेतनासाठी जिल्हा रुग्णालयाला निवेदन.

अहमदनगर - सुरक्षकांच्या थकीत वेतनासाठी जिल्हा रुग्णालयाला निवेदन.

 अहमदनगर - सुरक्षकांच्या थकीत वेतनासाठी स्वाभिमानी सुरक्षा रक्षक संघटनेचे जिल्हा रूग्णालय निवेदन देऊन उपोषणाचा दिला इशारा अहमदनगर शल्यचिकित्सक यांनाही पत्रव्यवहार केला जवळपास सात महिने पूर्ण झालेत आत्तापर्यंत एकही रुपया भेटला नाही यामुळे सुरक्षारक्षकांनी कसं जीवन जगायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागा अखत्यारीत असणार्या अहमदनगर जिल्ह्या सुरक्षा रक्षक मंडळा मार्फत जिल्हा रुग्णालयात 17 सुरक्षा रक्षक सुरक्षेचे काम करत आहे.वेळोवेळी पाठपुरावा करून देखील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा रक्षकांचा मागील सात महिन्यांचा पगाराबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही लॉकडाऊन च्या काळात सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबीयांची उपासमार चालू असताना जिल्हा रुग्णालय प्रशासनाला सदरील सुरक्षारक्षक कामा बाबतीत जरा ही किव आली नाही.

प्रशासनाला covid-19 हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याचबरोबर सुरक्षारक्षकांचा देखील जीव महत्त्वाचा आहे यांना पगारच भेटला नाही तरकुटुंब कस चालणार आहे  याही गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावे ही विनंती या संघटनेने वारंवार केली आहे covid-19 सारख्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी कर्मचारी काम करत नाहीत परंतु सिव्हिल हॉस्पिटल येथे अगदी वेळेवर सुरक्षा रक्षक अविरतपणे हजर राहतो त्यामुळे या सुरक्षारक्षकांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि सुरक्षारक्षकांचा पगार वर्ग करण्यात यावा अशी विनंती स्वाभिमानी सुरक्षारक्षक कामगार संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रतिनिधी गणेश राठोड अहमदनगर

No comments:

Post a Comment