ऑक्सीजन बेडसाठी विकास निधीतून 25 लाख द्या - नगरसेवक हरिदास चरवड - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, July 19, 2020

ऑक्सीजन बेडसाठी विकास निधीतून 25 लाख द्या - नगरसेवक हरिदास चरवड

नगरसेवक हरिभाऊ चरवड यांची लायगुडे हॉस्पिटल साठी ऑक्सीजन बेड आणि व्हेंटिलेटर साठी 25 लक्ष रुपये वर्ग करण्याची मागणीपुणे प्रतिनिधी :सिंहगड रोड वडगाव बुद्रुक येथील नगरसेवक हरिदास चरवड यांनी आपल्या सन २०२०-२१ प्रभाग क्र ३३ अ साठीच्या अंदाजपत्रकातून 25 लक्ष रुपये कमी करून तो निधी लगडमळा, सिंहगड रोड येथील स्व मुरलीधर पांडुरंग लायगुडे पुणे मनपा दवाखाना येथे ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर व इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पुणे शहराचे महापौर, आयुक्त आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढला असून रुग्ण संख्येचे दररोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत त्यामुळे पुणे शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच वयोवृद्ध आणि अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे ही तातडीची गरज लक्षात घेता सण २०२०-२१ च्या प्रभाग क्र 33 अ साठीच्या अंदाजपत्रकातून 25 लक्ष रुपये निधी कमी करून तो निधी लायगुडे हॉस्पिटल येथे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व इतर वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा अशी मागणी नगरसेवक चरवड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.No comments:

Post a Comment