शिक्रापूर - त्या’ पार्टीवर शिक्रापूर पोलिसांचा छापा, शिरूर तालुक्यातील 11 डॉक्टरांसह 2 हॉटेल मालकांवर FIR - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, July 18, 2020

शिक्रापूर - त्या’ पार्टीवर शिक्रापूर पोलिसांचा छापा, शिरूर तालुक्यातील 11 डॉक्टरांसह 2 हॉटेल मालकांवर FIR

त्या’ पार्टीवर शिक्रापूर पोलिसांचा छापा, शिरूर तालुक्यातील 11 डॉक्टरांसह 2 हॉटेल मालकांवर FIR

2) डाँक्टर साहेब तुम्ही सुध्दा..!!

       शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये आखाड (आषाढ) पार्टी करणाऱ्या 11 डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव ढमढेरे येथे ही पार्टी सुरू होती. पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्याने कोरोना काळात नियम तोडले म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याशिवाय दोन हॉटेल मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे

               मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील भीमाशेत वस्तीजवळ एका हॉटेलमध्ये पाच पेक्षा अधिक डॉक्टरांनी एकत्र येत गर्दी जमवली होती. शासकीय नियमानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी असताना देखील ओली पार्टी करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली होती. त्यांनतर पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलिस शिपाई विकास मोरे यांसह आदींनी त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सर्व डॉक्टर पळून जाऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता शिक्रापूर, सणसवाडी परिसरातील तब्बल अकरा डॉक्टरांनी एकत्र येत ओली-सुकी पार्टी करत असल्याचे आढळून आले.
        याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई विकास मोरे (रा. शिक्रापूर, ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी शिक्रापूर सणसवाडी परिसरातील नामांकित तब्बल अकरा डॉक्टरांसह दोन हॉटेलच्या मालकांवर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत तर या प्रकरणी मुळे डाँक्टरावर पोलीस प्रशासन काय भुमिका घेतात हा विषय चर्चा आहे

प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर

No comments:

Post a Comment