नेवासा - DYSP मंदार जवळे यांना नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरीबद्दल गृहविभागातर्फे पदक जाहीर. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, June 10, 2020

नेवासा - DYSP मंदार जवळे यांना नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरीबद्दल गृहविभागातर्फे पदक जाहीर.

नेवासा - DYSP मंदार जवळे यांना नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरीबद्दल गृहविभागातर्फे पदक जाहीर.

नेवासा - गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या नक्षलग्रस्त भागामध्ये सन 2015 ते 2019 या कालावधीत विशेष कामगिरी बजावल्याबद्दल आंतरिक सुरक्षा सेवा पदके जाहीर झाली आहेत. शासनाने पोलीस दलातील अधिकाऱ्यांसाठी आंतरिक सुरक्षा सेवा पदक 26 जणांना जाहीर केले आहे. त्यामध्ये अहमदनगर पोलीस दलातील शेवगाव विभागीय अधिकारी पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनाही पदक देण्यात येणार आहेत. पोलीस उपाधीक्षक मंदार जवळे यांनी सन 2015 ते 2018 या कालावधीमध्ये गोंदिया या जिल्ह्यात विशेष कामगिरी केल्याबद्दल शासनाच्या गृहविभागातर्फे हे पदक जाहीर झाले आहे. 

No comments:

Post a Comment