जाणून घ्या : हत्तीणीचे फोटो नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर का होतात व्हायरल.! | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, June 4, 2020

जाणून घ्या : हत्तीणीचे फोटो नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर का होतात व्हायरल.! | C24Taas |

हत्तीणीचे फोटो नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर का होतात व्हायरल!

केरळमध्ये एक संतापजनक गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या मलाप्पूरम येथील घटना उघडकीस आली. इथे एका गर्भवती हत्तीणीला काही समाजकंटकांनी फटाके भरलेलं अननस खाऊ घातलं. त्या हत्तीणीच्या तोंडात अननसमधील फटाके फुटले आणि तिच्या गर्भात असलेल्या पिल्लाचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन दिवसांनी या हत्तीणीनेही प्राण सोडले. ही हत्तीणी 14 ते 15 वर्षांची असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
वन विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ही दुर्दैवी घटना पुढे आली. यानंतर या हत्तीणीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
ही घटना मलप्पुरम जिल्ह्यात घडली. या ठिकाणी ही हत्तीणी अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर आली आणि ती गावात भरकटली. या गावातील काही स्थानिकांनी तिला अननसमध्ये फटाके भरुन खाऊ घातलं. हत्तीणीला भूक लागलेली असल्याने तिने तो अननस खाल्ला आणि काहीच क्षणात तिच्या पोटात फटाके फुटू लागले.

फटाक्यांच्या स्फोटामुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती. हत्तीणीने पूर्णवेळ सोंड आणि तोंड पाण्यात बुडवून ठेवलं होतं. ती फक्त पाणीच पीत होती. कदाचित यामुळे तिला बरं वाटत होतं. त्यामुळे मदतीसाठी आलेलं पथक वेळेवर तिच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही.
स्वत:साठी नाही तर गर्भातील पिल्लूसाठी तिचा संघर्ष
या घटनेत हत्तीणी मोठ्या प्रमाणात जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक हत्तीणीला घ्यायला गेली. मात्र, काही वेळातच या हत्तीणीने आपले प्राण सोडले. या मदत पथकात असलेले वन अधिकारी मोहन कृष्णन यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली. “तिने सर्वांवर विश्वास ठेवला. जेव्हा तिने अननस खाल्ला आणि काही वेळात तिच्या पोटात तो फुटला. तेव्हा ही चिंताग्रस्त झाली. कदाचित हत्तीणीला तिची नाही तर तिच्या पोटातील पिल्लूची काळजी असावी. या पिल्लूला ती येत्या 18 ते 20 महिन्यात जन्म देणार होती.”
तोंडालाही मोठ्या जखमा, अखेर तडफडून मृत्यू
तिच्या तोंडातही फटाके फुटले, त्यामुळे तिचं तोंडात आणि जीभेवर मोठ्या जखमा झाल्या. जखमांमुळे ती काहीही खाऊ-पिऊ शकत नव्हती. त्यानंतर तिचा तडफडून मृत्यू झाला .

त्यामुळे गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या झाल्याने नेटकऱ्यांकडून हत्तीणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

No comments:

Post a Comment