नेवासा - निसर्गचक्री वादळाने घरांसह केळी बागाचे नुकसान. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, June 5, 2020

नेवासा - निसर्गचक्री वादळाने घरांसह केळी बागाचे नुकसान. | C24Taas |

निसर्गचक्री वादळाने नेवासा तालुक्यातील अनेक १२ घरे ,१ झोपडी व शेतकऱ्यांच्या केळी बागाचे नुकसान झाले आहे. तर काही दुकानांवर झाड पडल्याने दुकानांचे देखील नुकसान झाले आहे.

नेवासा - राज्यात बुधवारी झालेल्या निसर्गचक्री वादळाचा फटका नेवासा तालुक्याला ही बसला असून तालुक्यातील १२ घरे,१ झोपडीसह ९.८० हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे उमलून पडली तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुधवारी रात्री नेवासा शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता.

बुधवारी रात्री नेवासा तालुक्यातील काही भागात निसर्ग चक्री वादळा प्रभाव दिसून आला तालुक्यातील वांजोळी, लोहगाव,भेंडा बुद्रुक,वडाळा येथील १२ कच्ची व पक्की घरे व १ झोपडीचे वादळाने नुकसान झालेले आहे.तर सोनई, निंभारी,अंमळनेर व धनगरवाडी येथील ९.८० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली.

भेंडा बुद्रुक येथे शेवगाव रस्त्यावरील व्यापारी बाजार पेठेतील आशया मोटार सायकल गॅरेज व इतर दुकांनावर वादळाने रात्री ८:४५ वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचे झाड पडले.झाड पडल्याने दुकानांचे किरकोळ नुकसान झाले आहे.हे झाड अर्धे रस्त्यावर आल्याने ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या साह्याने पडलेले झाडे बाजूला काढून घेतले आहे.कुकाणा येथील पाटबंधारे वसाहत मधील विश्रामगुहाजवळील झाड जोराच्या वाऱ्यामुळे मोडून पडले.
   

No comments:

Post a Comment