नेवासा - कोरोना योद्धयांचा मुस्लिम युवकांच्या वतीने गौरव. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, June 4, 2020

नेवासा - कोरोना योद्धयांचा मुस्लिम युवकांच्या वतीने गौरव. | C24Taas |

नेवासा - कोरोना योद्धयांचा मुस्लिम युवकांच्या वतीने गौरव. | C24Taas |

नेवासा - कोरोनाच्या संकटात योगदान देणाऱ्या योद्धयांचा पाठीवर थाप म्हणून नेवासा येथील मुस्लीम युवकांच्या वतीने गौरव करण्यात आला.यावेळी या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन युवा विधी तज्ञ अँड.जावेद ईनामदार यांनी यावेळी बोलतांना केले.
    नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणात छोटेखानी पद्धतीने झालेल्या कार्यक्रमात नेवासा पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार बाळासाहेब घुगरकर यांचा ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवाकार्याबद्दल तर पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते,पत्रकार सुहास पठाडे,पत्रकार शंकर नाबदे,पोलीस मित्र बाळू सोमा जाधव यांना कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा गौरव शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
   यावेळी अँड.जावेद ईनामदार यांच्यासह युवा सामाजिक कार्यकर्ते मुख्तारभाई शेख,हारूणभाई जहागीरदार,शफीकभाई पटेल जेटली,शफीभाई शेख, भाईजान नेवासाफाटा,नदीम पठाण,आसिफभाई मेटर पठाण,इम्रानभाई पटेल,शोएब पठाण,अमजद पठाण, अजमतभाई पठाण,हाजी जमशिद पठाण,अय्युबभाई जहागीरदार,वसीम शेख,शननो शेख,रिज्जू शेख,शरीफ शेख,इम्रान शेख,अल्ताफ मन्सूरी,जमीर बागवान, नाजीम शेख,जमू शेख,रौफ शेख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment