अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा १५ कोरोना रुग्ण आढळले ; एकूण संख्या ३९७ | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, June 27, 2020

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा १५ कोरोना रुग्ण आढळले ; एकूण संख्या ३९७ | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले १५ नवे रुग्ण ; जिल्ह्याची संख्या ३९७. तर ०८ रुग्णांची कोरोनावर मात.

अहमदनगर जिल्ह्यात आज ८ कोरोनग्रस्त
आजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २७३ झाली आहे. तर, आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने १५ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या ही १११ झाली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरात ६ बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नालेगाव ३, आडते बाजार १, तारकपूर १ आणि तोफखाना १ असे रुग्ण आढळले आहेत. यातील तारकपुर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता. याशिवाय, श्रीगोंदा तालुका ०३, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी ०१ आणि  राहाता तालुक्यात ०२ कोरोना बाधित आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेल्या व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आल्या होत्या,अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

 दरम्यान, जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या आता १११ झाली असून एकूण नोंद रुग्ण संख्या ३९७ इतकी झाली आहे तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.**

No comments:

Post a Comment