नेवासा - ९ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यूने तालुक्यात खळबळ.! | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, June 21, 2020

नेवासा - ९ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यूने तालुक्यात खळबळ.! | C24Taas |

नेवासा - ९ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यूने तालुक्यात खळबळ.! | C24Taas |

नेवासा - तालुक्यातील सौंदाळा येथील ९ वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यूने रविवार २१ जून रोजी तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा शेवगाव महामार्गावरील सौंदाळा गावातील इयत्ता चौथी मध्ये शिकणारी मुलगी शनिवार दि.२० जून रोजी रात्री घरात झोपली होती.
रविवार सकाळी आई-वडील शेतातून घरी आल्यावर तिला  झोपेतून उठविले असता ती झोपेतून उठली नाही.सर्पदंश झाला असेल असे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरने तपासून ती उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.
नेवासा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी पोलीस स्टेशनला खबर दिली त्यावरून नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  मयत मुलीच्या पायावर जखमा दिसून आल्या असून शरीर काळे-निळे पडल्याचे आढळून आले.
श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, सहाय्यक निरीक्षक भारत दाते यांचे पथकाने सौंदाळा येथील घटनास्थळी जाऊन पाहणी करून मयत मुलीचे आई-वडील व इतर नातेवाईकांची सुमारे तासभर कसून चौकशी केली.



No comments:

Post a Comment