नेवासा - शनि शिंगणापूर देवस्थानकडून दोन्ही सोहळे रद्द. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, June 18, 2020

नेवासा - शनि शिंगणापूर देवस्थानकडून दोन्ही सोहळे रद्द. | C24Taas |


नेवासा -  शनि शिंगणापूर देवस्थानकडून दोन्ही सोहळे रद्द. | C24Taas |


नेवासा - कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने भारतातील सर्व मंदिरे बंद करण्याचा आदेश दिल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर देखील बंद ठेवण्यात आले आहे.  त्याच पार्श्वभूमीवर श्री शनैश्वर देवस्थान काही दिवसांपूर्वी शनि जयंती देखील साध्या पद्धतीने साजरी केली. आता शनिशिंगणापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा व शनिअमावस्या यात्रा रद्द करण्यात आले असल्याचे देवस्थानी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शनि शिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,श्री शनैश्वर देवस्थानने जगभरामध्ये कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण, तसेच महाराष्ट्रातील कारोना बाधितांची संख्या लक्षात घेता तसेच जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन गर्दीची ठिकाणे नियंत्रीत करण्याचा निर्णय घेऊन सर्व प्रकारच्या धार्मिक स्थळांना दर्शन बंद करण्याचे तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद व एक सामाजिक जबाबदारी म्हणुन श्री शनैश्वर देवस्थान प्रशासनाने सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र शनिशिंगणापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर महंत उदासी महाराज आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द केलेला आहे.
तसेच शनिवार दि.20 जून 2020 रोजी होणारी दर्श शनिअमावस्या यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. तरी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे दर्शनार्थ येणा-या सर्व भाविकांनी कृपया याची नोंद घेऊन श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील गर्दी नियंत्रणासाठी देवस्थानास सहकार्य करावे असे आवाहन विश्‍वस्त मंडळ, ग्रामपंचायत शनिशिंगणापूर व ग्रामस्थ यांचेवतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment