नेवासा - विवाह सोहळ्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ना. गडाख यांच्याकडे धनादेश सुपूर्त. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, June 14, 2020

नेवासा - विवाह सोहळ्याचा खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ना. गडाख यांच्याकडे धनादेश सुपूर्त. | C24Taas |

नेवासा येथे जिरे व पंडुरे यांच्या साध्या पद्धतीच्या विवाह सोहळयात मुख्यमंत्री सहायता निधी साठी २१ हजार निधीचा धनादेश ना.शंकरराव गडाख यांच्याकडे सुपूर्त.


नेवासा येथील जिरे - पंडुरे यांच्या साध्या पद्धतीच्या विवाह सोहळयाला नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली यावेळी इतर खर्चाला फाटा देत वधूवरांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजाराचा निधी धनादेशाद्वारे नामदार शंकरराव गडाख यांच्या कडे सुपूर्त करण्यात आला.
नेवासा येथील छोटुराम जिरे यांची कन्या चि.सौ.का.सोनाली हिचा शुभविवाह नगर येथील रामदास पंडुरे यांचे चिरंजीव उमेश यांचेशी छोटेखानी पद्धतीने नेवासा येथे आयोजित करण्यात आला होता.सोशल डिस्टनसिंगचे पालन करत पार पडलेल्या या विवाह सोहळयाप्रसंगी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी रविवारी सकाळीच भेट दिली. यावेळी २१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन्ही ही परिवाराच्या वतीने नामदार शंकरराव गडाख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्याबद्दल नामदार गडाख यांनी शासनाच्या वतीने जिरे व पंडुरे परिवाराला धन्यवाद देत या आदर्शवत छोटेखानी विवाह सोहळयाला शुभेच्छा देत आभार मानले.
यावेळी स्टेट बँकेचे नेवासा शाखा व्यवस्थापक बाळासाहेब साबळे,पोपटराव जिरे,वधूपिता छोटूराम जिरे,पत्रकार सुधीर चव्हाण, पत्रकार रमेश शिंदे,गणेश कोरेकर,नामदार गडाख यांचे स्वीय सहायक अनिल दरंदले,सुनील जाधव,राजेंद्र लोखंडे,उपस्थित होते.या विवाह सोहळयास विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी भेट देऊन वधूवरांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या या महामारीत मोजक्याच पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत पार पडलेल्या या विवाह सोहळया प्रसंगी उपरणे टोपी ऐवजी मास्क व सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर प्रेशर मशीन लावण्यात आले होते.

No comments:

Post a Comment