ब्रेकिंग - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, June 11, 2020

ब्रेकिंग - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह. | C24Taas |

ब्रेकिंग - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व  ठाकरे सरकारातील राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते व  ठाकरे सरकारातील राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे हे ठाकरे सरकारमधील तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर दोन मंत्र्यांना कारोनाची लागण झाली होती.
धनंजय मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी रात्री या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल आला. धनंजय मुंडे आज शुक्रवारी रूग्णालयात दाखल होणार आहेत. धनंजय मुंडे दररोज मंत्रालयात जात होते. मंगळवारी झालेल्या बैठकीला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते. 
मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, पीए, मुंबईतील वाहन चालक, बीडचे वाहनचालक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणालाही लक्षणे नाहीत. या आठवड्यात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुंडे हजर होते. धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले असून ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते. 
यापूर्वी दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे

No comments:

Post a Comment