लॉकडाऊन इफेक्ट' बीडमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, June 9, 2020

लॉकडाऊन इफेक्ट' बीडमध्ये व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्याबीड (प्रतिनिधी):कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे दुकान बंद होते. त्यामुळे आर्थिक संकट ओढावल्याने नैराश्येतून बीड जिल्ह्यातील एका कापड व्यापाऱ्याने आत्महत्या केली आहे.
बीड - तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 34 वर्षीय कापड व्यापाऱ्याने चौसाळा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 9 जून) घडली आहे. 
संतोष बलभीम क्षीरसागर (वय 34 वर्षे, रा. नांदुर घाट), असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संतोष शिरसागर हे कपड्याचा व्यापार करतात. बीड जिल्ह्यातील केज येथे त्यांचे छोटेसे कपड्याचे दुकान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरु झाल्यापासून सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. काही लोकांकडून त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्याची परफेड कशी करायची या विवंचनेतून आलेल्या नैराश्याने संतोष क्षीरसागर याने हे पाऊल उचलले.

प्रतिनिधी:औसरमल गौतम सह 
 कृष्णा नन्नावरे

No comments:

Post a Comment