बीड प्रतिनिधी: शिरूर (का) शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संगणक संचासह महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले आहे.
शनिवारी मध्यरात्री सुमारे एकच्या दरम्यान अचानक बँकेत शॉर्टसर्किट झाले होते.आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे या आगीत दोन कॅश काऊंटर,तीन संगणक संच,दोन प्रिंटर,दोन कॅश काऊंटिंग मशीन,एअर कंडिशनर,सहा सी.सी.टि.व्ही.कॅमेरे,तीन फॅन,बारा ट्यूबलाईट,वायरिंग,पी ओ पी असे मिळून जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पो. ना. बाळासाहेब नागरगोजे हे करत आहेत.
बीड (प्रतिनिधी):औसरमल गौतम सह
नन्नावरे कृष्णा
No comments:
Post a Comment