बीड (प्रतीनिधी): बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आणि महसुली मंडळात अवकाळी पाउस झाला. सर्वाधील पाऊस माजलगाव आणि वडवणी तालुक्यात झाला असून नित्रुड (ता. माजलगाव) मंडळात तर अतिवृष्टीची नोंद झाली.. नित्रुड मंडळात मागील २४ तासात ८३ मिमी पाऊस पडला आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण २२३.४ मिमी पाऊस झाला असून सरासरीच्या तुलनेत ६.२५ टक्के पाउस झाला आहे.
मंगळवारी देखील सकाळपासूनच जिल्ह्यातील बहुतांशी भागात ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून भुरभूर सुरु होती. मध्यरात्री मात्र पावसाने जोर पकडला. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक ३९.८ मिमी तर त्या खालोखाल वडवणी तालुक्यात ३४.५ मिमी पाऊस झाला. दरम्यान, मान्सूनला सुरुवात होण्यापूर्वीच महावितरणने पावसासमोर गुडघे टेकले आहेत. पावसाला सुरुवात झाल्यावर मध्यरात्रीनंतर बराच काळ अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित राहिला.
▪ *तालुकानिहाय पाऊस (दि. ०३ जून २०२०) :*
बीड - १०.६ मि.मी.
पाटोदा - ११.८ मिमी.
आष्टी - २९.३ मिमी.
गेवराई - १४.६ मिमी.
शिरूर का. - ५.७ मिमी.
वडवणी - ३४.५ मिमी.
अंबाजोगाई - १८ मिमी.
माजलगाव - ३९.८ मिमी.
केज - ११.७ मिमी.
धारुर - ३१ मिमी.
सी 24 तास प्रतिनिधी :औसरमल गौतम सह नन्नवरे कृष्ण
No comments:
Post a Comment