वादळी वाऱ्यातील नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी - सय्यद सुभान - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, June 26, 2020

वादळी वाऱ्यातील नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी - सय्यद सुभान

वादळी वाऱ्यातील नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी - सय्यद सुभान


बीड प्रतिनिधी: गेवराई- तालुक्यात दिनांक २५/६/२०२० रोजी गारपीटीसह वादळी वाऱ्याने झालेल्या पावसामुळे अनेक लोकांच्या घरांची पत्रे, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ,धान्याचे नुकसान, घराची पडझड झाले आहे .तरी हे नुकसान व इतर अनेक लोकांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असुन त्यांना शासनाने मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. तरी कोविड १९च्या महामारीने गोरगरीब जनता व शेतकरी व सर्व सामान्य आदीपासुनच खालावलेले आहेत त्यामुळे या झालेल्या गारपीट व चक्रीवादळ पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे गेवराई तालुक्यातील शेतकर्‍यांना पंचनामा करून तात्काळ १००००रु नुकसान भरपाई देण्यात यावी या संदर्भात वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद सुभानभाई, युवक तालुकाध्यक्ष बंटी सौंदरमल,जिल्हा उपाध्यक्ष सुदेश पोतदार ,तालुका महासचिव किशोर भोले . शहराध्यक्ष कैलास भोले, महासचिव सुधाकर केदार ,समन्वयक तालुकाध्यक्ष प्रदिप शिंदे ,युवा नेते सतिष प्रधान, कुमार भोले ,किरण पाटोळे, अमोल सुतार सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाची दखल न घेतल्यास वंचित बहुजन आघाडी गेवराई तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बीड प्रतिनिधी : गौतम औसरमल सह कृष्णा नन्नवरे


No comments:

Post a Comment