डॉ. संगीता खेनट यांची पुणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या उपाध्यक्षपदी निवड - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, June 2, 2020

डॉ. संगीता खेनट यांची पुणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या उपाध्यक्षपदी निवडपुणे, ता. 30 : राष्ट्रवादी डॉक्टर सेल पुणे शहर उपाध्यक्षपदी डॉ. संगीता नरेंद्र खेनट यांची निवड करण्यात आली आहे. सेलचे शहर अध्यक्ष डॉ. सुनील जगताप आणि कार्याध्यक्ष डॉ. राजेश पवार यांनी ही निवड घोषित केली आहे. डॉ संगीता खेनट यांनी गेली अनेक वर्ष सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष पद भूषवलेलं आहे. तसेच डॉ. खेनट यांनी राष्ट्रवादी डॉक्टर सेल च्या विविध उपक्रमामध्ये पुढाकार घेऊन डॉ संगीता माने, डॉ. कविता ढमाले, डॉ. मयुरा टेकाडे, डॉ. दीपाली वाघ, व डॉ. अनुपमा गायकवाड यांना बरोबर घेऊन एक महिला डॉक्टरांची स्वतंत्र डॉक्टर सेलची विंग तयार केली आहे. सध्या या विंगमध्ये शंभराहून अधिक महिला डॉक्टर सभासद आहेत. यावेळी डॉ. सुनील जगताप यांनी डॉ. खेनट यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment