भाजप शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवड - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, June 1, 2020

भाजप शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवडपुणे : भारतीय जनता पक्षाच्या शहर सरचिटणीसपदी दीपक नागपुरे यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना दिले. नागपुरे यांच्यासह राजेश येनपुरे व गणेश घोष यांची सरचिटणीसपदी निवड झाली आहे. आपल्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, रवी अनासपुरे, राजेश पांडे यांचे दीपक नागपुरे यांनी आभार मानले. येत्या काळात पक्षसंघटनेसाठी झोकून देऊन काम करणार असल्याचे नागपुरे म्हणाले.

No comments:

Post a Comment