अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 18 रुग्ण आढळले ; एकूण रुग्णांची संख्या 302 - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, June 21, 2020

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 18 रुग्ण आढळले ; एकूण रुग्णांची संख्या 302

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात 18 रुग्ण आढळले ; एकूण रुग्णांची संख्या 302

अहमदनगर जिल्ह्यात आज रविवार 21 जून रोजी सकाळी कोरोना बाधित 12 रुग्ण आढळले होते. तर सायंकाळी पुन्हा 6 रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यामुळे आजच्या दिवशी 18 रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 302 झाली आहे...नगर शहरातील तोफखाना भागातील 62 वर्षीय महिला, सिद्धार्थनगर भागातील 35 वर्षीय पुरुष आणि सावेडी उपनगरातील रासने नगर येथील 62 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे.श्रीगोंदा शहरातील 18 वर्षीय युवक आणि 65 वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा तर श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील 37 वर्षीय महिलाही बाधित झाली आहे. यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. जिल्ह्यातील 45 जणांवर उपचार सुरू आहे.

No comments:

Post a Comment