वडाळा बहिरोबा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 100 वृक्षांचे वृक्षरोपण करत; लग्नाचा वाढदिवस साजरा. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, June 5, 2020

वडाळा बहिरोबा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 100 वृक्षांचे वृक्षरोपण करत; लग्नाचा वाढदिवस साजरा.

नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे लग्नाच्या वाढदिवस साजरा न करता, गावाला 100 वृक्ष भेट.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करत लग्नाचा वाढदिवस साजरा.

नेवासा - मंडलिक परिवाराच्या वतीने लग्नाचा वाढदिवस साजरी करण्याऐवजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा ग्रामपंचायतला 100 वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी सरपंच सौ मिनलताई मोटे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .जि प प्रा शाळेच्या शिक्षिका सौ तिजोरे-मंडलिक मॅडम व पाटबंधारे विभागातील अधिकारी श्री मंडलिक साहेब यांचे लग्नाचे वाढदिवसानिमित्त पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन या दाम्पत्याचे वतीने ,ग्रामपंचायतीला 100 वृक्ष देण्यात आले. आज वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिन असल्याने महिलांचे हस्ते यावेळी संपुर्ण वृक्षारोपण करण्यात आले. कौतुकास्पद केलेल्या कार्याबद्दल सरपंच सौ मिनलताई मोटे व उपसरपंच श्री राहुलशेठ मोटे यांचे हस्ते श्री व सौ मंडलीक दाम्पत्याचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी ऍड श्री चांगदेव पा मोटे, ग्रा वि अ श्री सतिश मोटे, ज्ञानदेव शिंदे, का तलाठी श्रीकांत भाकड ,ग्रा प सदस्य श्रीमतीविजुताई ओनावले मुख्याध्यापक श्री अशोक गायकवाड, सावंत सर, बापुसाहेब मोटे, उमेश पतंगे, संदिप मोटे, विशाल मोटे, राजेश मोटे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment