नेवासा - २ गटात हाणामारी : तलवार, कुऱ्हाडीचा वापर ; ८ जण जखमी, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 10, 2020

नेवासा - २ गटात हाणामारी : तलवार, कुऱ्हाडीचा वापर ; ८ जण जखमी, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. | C24Taas |

माळीचिंचोरात २ गटात हाणामारी :
तलवार, कुऱ्हाडीचा वापर ; ८ जण जखमी, ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. | C24Taas |


नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे मागील भांडणाचा राग धरून २ गटात तुंबळ हाणामारी झाली.तलवार व कुऱ्हाडीचा वापर करण्यात आला यामध्ये दोन्ही गटाचे मिळून ७ ते ८ जण जखमी झाले आहे दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या असून एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/Ev0QA8krOYs5wYSqC3PQw9

याबाबत पहिली फिर्याद ज्ञानेश्वर रामदास वाघमारे (वय २३) रा.माळीचिंचोरा यांनी नेवासा पोलीस स्टेशनला दिली असून त्यात म्हंटले आहे की मी व माझा भाऊ सचिन असे राहत असलेल्या घरासमोर गप्पा मारत उभा होतो त्यावेळी बापूसाहेब राजाबापू नाथा शेंडे,विष्णू राधाकिसन शेंडे, महेश राधाकिसन शेंडे, उमेश राधाकिसन शेंडे, करण गणपत शेंडे, उपचारवसू उर्फ हरी गणपत शेंडे, पप्पू रामहरी शेंडे, दरवेश बापूसाहेब शेंडे (सर्व रा. माळीचिंचोरा ) हे अचानक सर्व जण घरासमोर आले व मागील जुन्या भांडणाचा राग मनात धरून आम्हाला शिवीगाळ करू लागले.तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही विनाकारण शिवीगाळ का करत आहे असे म्हंटल्याचा राग मनात धरून बापूसाहेब याने त्याच्या हातातील तलवारीने माझ्या डोक्यात वार करून जखमी केले.माझा भाऊ सचिन मला सोडविण्यासाठी येत असताना विष्णू राधाकिसन याने सचिन यास धक्काबुक्की करून तलवारीने डोक्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.महेश व उमेश राधाकिसन शेंडे हे दोघे आरडा ओरड करत म्हणाले की, तुम्हाला आज जिवंत सोडणार नाही.तुमचा काटा काढू. हे ऐकताच माझे काका चंद्रकांत अंबाडे, मावशी मंगल अंबाडे व आजी, भाऊ किरण वाघमारे तसेच मावशी मंगळ बहीण तेजस्वी गुजर यांनाही मारहाण करण्यात आली.यातील जखमी नेवासा फाटा येथील श्वास रुग्णालयात उपचार घेत आहे. बापूसाहेब राजाबापू नाथा शेंडे, विष्णू राधाकिसन शेंडे, महेश राधाकिसन शेंडे, उमेश राधाकिसन शेंडे, करणं गणपत शेंडे, उपचारवसू उर्फ हरी गणपत शेंडे, पप्पू रामहरी शेंडे, दर्वेश बापूसाहेब शेंडे या आठ जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा नेवासा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद विष्णू राधाकिसन शेंडे (वय २६) रा. माळीचिंचोरा यांनी दिली असून त्यात म्हंटले आहे की,दि. ८ मे रोजी सकाळी दहा वाजता भाऊ उमेश राधाकिसन शेंडे हा गावात असताना त्याला ज्ञानेश्वर वाघमारे याने शिवीगाळ केली व म्हणाला की, तुम्ही मला एक वर्षांपूर्वी दमदाटी केली होती ते मी विसरणार नाही असे म्हणून दमबाजी केली.हे समजल्यानंतर मी व माझा भाऊ उमेश असे अशोक गुजर यांच्या घरी गेलो तेव्हा तिथे रामदास वाघमारे, किसन रामदास वाघमारे, सचिन रामदास वाघमारे (सर्व रा. माळीचिंचोरा) हे भेटले तेव्हा मी ज्ञानेश्वर यास विचारले तुम्ही माझ्या भावाला शिवीगाळ का केली असे म्हंटल्यावर ज्ञानेश्वरने लगेच शिवीगाळ व दमबाजी केली.त्याने हातात असलेल्या कुऱ्हाडीने माझ्या डोक्यात वार केले.सचिन व किरण याने लाथाबुक्क्याने मारहाण केली.याठिकाणी सुभाष चिंधे, अशोक चिंधे, विजय कचरू देव्हारे यांनी भांडणे सोडल्यानंतर पुतण्या वैभव रामहरी शेंडे याने दुचाकीवरून आम्हाला वडाळा येथील एफजेएम हॉस्पिटलमध्ये आणले या ठिकाणी मी स्वतः उपचार घेत आहे असे विष्णू शेंडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
नेवासा पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


No comments:

Post a Comment