अहमदनगर जिल्ह्यात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णांची संख्या १४१ वर. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 31, 2020

अहमदनगर जिल्ह्यात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णांची संख्या १४१ वर. | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात आणखी १० जण कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णांची संख्या १४१ वर. | C24Taas |

अहमदनगर जिल्ह्यात आणखी १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व मुंबई येथून जिल्ह्याच्या विविध भागात आले आहे. कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील १२ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगी असे ०२ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. ते यापूर्वीच्या रुग्णाचे नातेवाईक असल्याचे कळते. राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील ३५ वर्षीय पुरुष, बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता. त्यालाही कोरोना झाला आहे. संगमनेर तालुक्यातील ०५ जणांना कोरोना झाला आहे. यामध्ये कवठे कमळेश्वर येथील ३७ वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली ५२ वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील २७ वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले. त्यांना सारी ची लक्षणे आढळून आली होती. त्यांचाही कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील २२ व २४ वर्षीय युवक हेही बाधिताच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कोरोना झाला आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली ३६ वर्षीय महिला. अहमदनगरमधील केडगाव भागात एक महिला मुंबई येथून आली आहे. तिलाही कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. 

No comments:

Post a Comment