लातूर - टोळधाडीचा प्रतिबंधासाठी कृषी विभागाने सज्ज रहावे. - सभापती गोविंद चिलकुरे. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, May 29, 2020

लातूर - टोळधाडीचा प्रतिबंधासाठी कृषी विभागाने सज्ज रहावे. - सभापती गोविंद चिलकुरे. | C24Taas |

लातूर - टोळधाडीचा प्रतिबंधासाठी कृषी विभागाने सज्ज रहावे. - सभापती गोविंद चिलकुरे. | C24Taas |


लातूर - टोळधाडी आपल्या राज्यात शिरकाव झाला आहे. ही टोळधाडचा शेतातील पिके, वनस्पती,  झाडा- झूडपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. त्यामुळे शेतक-यांनी व कृषी विभागाने  वेळीच काळजी घेवून विविध उपाययोजनांचा वापर करूण टोळधाडचा लातूर जिल्ह्यात येण्यापासून अटकाव करण्यासाठी सज्ज रहावे असे  आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे व कृषी सभापती गोविंद चिलकुरे यांनी केले आहे.
कोरोना आजाराच्या सावटाखाली आता टोळधाडचा आपल्या राज्यात  शिरकाव ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे या बाबीकडे सर्वांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अशावेळी शेतात टिनचे डबे, वाद्य, फटाके व इतर साहित्याचा वापर करून शेतात टोळधाड आल्यास मोठा आवाज केल्यास होणारे नुकसान टळू शकते. या सोबतच कडुनिंब, धोञा, इतर तण, पालापाचोळा शेकोटीच्या माध्यमातून टोळधाडच्या थव्यास रोखता येईल. या टोळधाडचा सायंकाळी किंवा राञी  हल्ला होत असल्याने मशालीच्या धुराचा देखील उपयोग होवू शकतो. विविध प्रकारच्या या उपाययोजनांचा वापर करून शेतक-यांनी शेतीचे संरक्षण करावे.
तसेच कृषी विभागाने देखील या बाबतीत योग्य ती काळजी घेवून तज्ञांच्या माध्यमातून टोळधाडचा नायनाट कसा करावा या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना देखील लातूर जिल्हा परिषदेचे कृषी सभापती गोविंद चिलकुरे  यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जिल्हा परिषद कृषी समिती सदस्य महेश पाटील, कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र डॉ.भामरे ,कृषी विद्यावेता डॉ.सूर्यवंशी, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन डिग्रसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्र्य गवसाने, कृषी विकास अधिकारी एस.आर.चोले, उपविभागीय कृषी अधिकारी महेश तीर्थकर, उपस्थित होते.
                        सभापती गोविंद चिलकुरे

अशी घ्याल काळजी...
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लिंबोळी आधारित कीटकनाशक अझाडिरेक्टीन १५०० पी. पी.एम.३० मी.लि., किंवा ५ टक्के लिंबोळी अर्काची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी. गहु किंवा भाताच्या २० किलो    तुसामध्ये फिप्रोनिल  ५ एस.सी. ३ मि.ली. मिसळून त्याचे ढिग शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. मिथील पॅराथिऑन २ टक्के भुकटी २५ ते ३० किलो प्रती हेक्टरी धुरळणी करावी. टोळाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणत असल्यास क्लोरपारिफॉस २० ई.सी २४ मी.ली. किंवा क्लोरपारीफॉस ५० ई.सी. १० मीली किंवा डेल्टामिथ्रीन २.८ ई.सी. १० मीली किंवा फिप्रोनिल ५ एस.सी. २.५ मीली किंवा लेम्डासायहॅलोर्थीन ५ ई.सी. १० मीली किंवा  मेलॅथिऑन ५० ई.सी.३७ मीली.प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुषार ससाणे :C24 प्रतिनिधी,लातूर

No comments:

Post a Comment