अहमदनगर शहरात एकाच कुटुंबातील ५ जण ; तर संगमनेर मध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, May 29, 2020

अहमदनगर शहरात एकाच कुटुंबातील ५ जण ; तर संगमनेर मध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह. | C24Taas |

अहमदनगर शहरात एकाच कुटुंबातील ५ जण ; तर संगमनेर मध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर - नगर शहरात एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. यामध्ये ४ पुरुष आणि १ महिलेचा समावेश आहे. हे कुटुंब रेल्वे स्टेशन रोडवरील सथ्था कॉलनीतील रहिवाशी असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले. याच कुटुंबातील आणखी १ महिलाही कोरोनाबाधित असून ती पुणे येथे राहत आहे.
याशिवाय संगमनेर तालुक्यातही २ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील भारतनगर आणि मोेमीनपुरा येथील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यात एकाच दिवशी ७ कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे नगर शहरात चिंता वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणा-यांची संख्या वाढली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे क्वारंटाईन न होता थेट नातेवाईकांच्या घरात जात असल्याने जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

No comments:

Post a Comment