बीड जिल्ह्यात आज दिवसभरात ८ नवे कोरोना रुग्ण. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, May 26, 2020

बीड जिल्ह्यात आज दिवसभरात ८ नवे कोरोना रुग्ण. | C24Taas |

बीड जिल्ह्यात आज दिवसभरात ८ नवे कोरोना रुग्ण. | C24Taas |


बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णात दररोज वाढ होत आहे. आज मंगळवारी दिवसभरात एकूण आठ संशयितांच्या स्वॅबचे अहवाल ‌पाॅझिटीव्ह‌ आले आहेत. कोरोनाने आज परळी आणि शिरूर का. तालुक्यातही शिरकाव केल्याचे स्पष्ट झाल्याचे सध्या फक्त अंबाजोगाई तालुका कोरोना विरहित राहिला आहे.

सोमवारी पाठविल्या पैकी ०७ संशयितांचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी दोघांचे अहवाल आज पाॅझिटीव्ह‌ आले. हे दोघेही बीड शहरातील आहेत, तर उर्वरित ०५ अहवाल अनिर्णीत आहेत. आज मंगळवारी ३० संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. २२ अहवाल निगेटिव्ह असून २ प्रलंबित आहेत. आजच्या सहा पाॅझिटीव्ह‌मध्ये परळी तालुक्यातील हाळंब येथील ०२, शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथील ०१, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील ०१ आणि वाहली येथील एकाचा समावेश आहे. आजच्या आठ रुग्णांसह जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ४७ झाली आहे.

प्रतिनिधी - कृष्णा नन्नवरे,सी 24 तास न्यूज बीड.

No comments:

Post a Comment