लातूर - आरोग्य,शेतीच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधीनी तात्काळ बैठक घ्यावी ;भाजपाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, May 29, 2020

लातूर - आरोग्य,शेतीच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधीनी तात्काळ बैठक घ्यावी ;भाजपाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी. | C24Taas |

लातूर - आरोग्य,शेतीच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधीनी तात्काळ बैठक घ्यावी ;भाजपाची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी. | C24Taas |


लातूर - आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करून उपाययोजना आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी अशी मागणी जिल्हा भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
लातूर जिल्ह्यात कोरोनाने उग्र रूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,दरम्यान मान्सून अगदी काही दिवसावर आल्याने शेतकऱ्यांना लागणारे खत बी बियाणे वेळेवर आणि गरजेनुसार मिळणे आवश्यक आहे. मात्र बाजारात खत आणि बियाण्याची अधिकच्या भावाने विक्री होत होत असल्याने  काळाबाजार रोखण्यासाठी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य आणि शेतीच्या प्रश्न बाबत तातडीने चर्चा करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची तात्काळ बैठक घेण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या वतीने लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर जिल्हाध्यक्ष आमदार रमेशअप्पा कराड, खा. सुधाकर शृंगारे,औदा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, जिपचे अध्यक्ष राहुल केंद्रे,उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे उपस्थित होते.
C24तास प्रतिनिधी : तुषार ससाणे,लातूर

No comments:

Post a Comment