हरित उदगीर, हरित जळकोट संकल्पना लोक चळवळीतुन राबविली जाणार – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, May 28, 2020

हरित उदगीर, हरित जळकोट संकल्पना लोक चळवळीतुन राबविली जाणार – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे. | C24Taas |

हरित उदगीर, हरित जळकोट संकल्पना लोक चळवळीतुन राबविली जाणार – पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर : जिल्ह्यात वन क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी वृक्षलागवड ही लोक चळवळ व्हावी यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा पुढील काळात हरित उदगीर व हरित जळकोट ही संकल्पना राबविली जाणार असल्याचे प्रतिपादन माहिती राज्याचे पाणीपुरवठा, पर्यावरण राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 5 जून 2020 रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासंबंधीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी रोहयो चे उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी विभागीय वन अधिकारी उस्मानाबाद मछिद्रं गायकर, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी प्रियंका गंगावणे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तहसीलदार संदीप कुलकर्णी, मुख्याधिकारी न. प. उदगीर भरत राठोड, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण . गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्यासह बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वरजी निटुरे, प्रा. शिवाजीराव मुळे, मन्मथ अप्पा किडे, अर्जुन मामा आगलावे , सिध्देश्वरजी पाटील, शिवाजी अण्णा केंद्रे, कल्याणजी पाटील, चंदन पाटील नागराळकर, बाबुराव जाधव, बालाजी ताकबीडे , संतोष तिडके,बापुराव राठोड, समीर शेख उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटले की, या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाचे वृक्ष लागवडीचे जे उदीष्ट आहे त्याप्रमाणे नियोजन करण्यात यावे. सामाजिक वनीकरण विभागाने 30जून 2011 चा शासन निर्णय नुसार राज्यात वृक्षलागवडीचा बिहार पँटर्न राबवावा पर्यावरण दिनानिमित्त उदगीर, जळकोट या तालुक्यात लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपासाठी दोन्ही तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सामिती स्थापण करण्यात येणार आहे. ही समिती तालुक्यातील प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याशी समन्वय साधेल प्रत्येक ग्रामपंचायतीस झाडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मागील काही वर्षाचा अनुभव पाहाता काही सेवाभावी संस्था 5 जून 2020 रोजी वृक्ष लागवड करत असतात या संस्था मार्फत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीचा आढावा घेऊन ज्या संस्था या वृक्ष लागवड व संगोपन पुढील तीन वर्षे यशस्वी करतील त्या संस्था पैकी प्रथम,द्वितीय व तृतीय येणाऱ्या संस्थास अनुक्रमे रू.11 लाख, रू. 5लाख व रू.3 लाख बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

No comments:

Post a Comment