कोरोना अपडेट : नेवासा बुद्रुक येथील नागरिकांना दिलासा; अहवाल प्राप्त. | C24Taas |
नेवासा - कल्याण येथून नेवासा बुद्रुक येथे आलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 5 नातेवाईकांचा कोरोना तपासणीचा अहवाल नेवासा तालुका आरोग्य विभागाला सायंकाळी मिळाले आहे. 20 मे रोजी 60 वर्षाची महिला नातेवाईकांसोबत कल्याण येथून नेवासा बुद्रुक येथे आली होती. त्या महिलेला 22 मे रोजी त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठवल्यानंतर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह 24 मे रोजी आला त्यानंतर नेवासा तालुका प्रशासनाने तिच्या संपर्कात आलेल्या 4 जणांना ताब्यात घेऊन रविवार 24 मे रोजी तपासणीसाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटर मध्ये या व्यक्तींचे घशातील स्त्राव जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये पाठवून तपासण्यात आले. त्याचा अहवाल आज मंगळवार 26 मे रोजी सायंकाळी चारही व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर त्या महिलेच्या 1 मुलीला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्या महिलेच्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने अहमदनगर येथे क्वारंटाईन करण्यात आले.मात्र अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात भीती कमी झाली आहे. नेवासा येथून पाठवलेले कोरोनाचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर उद्या 2 व्यक्तींचे घशातील स्त्राव चे नमुने घेतले जाणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.
- नेवासा तालुक्यातील ताज्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी C24Taas या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा.👇https://chat.whatsapp.com/LK4IvTTn5XfJ49zFT9aGYM
दरम्यान कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील नातू हा मनोरुग्ण आहे तो जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केलेला असताना गावात फेरफटका मारत होता. मात्र ती महिला पॉझिटिव आल्यानंतरही वास्तव्यास असणाऱ्या शाळेमध्ये आणि गावामध्ये ग्रामपंचायतीने व प्रशासनाने जंतुनाशक औषध फवारणी केली नाही. आता ग्रामिण भागात कोरोनाचा फैलाव होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment