ना.शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांमध्ये समाधान. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, May 23, 2020

ना.शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांमध्ये समाधान. | C24Taas |

ना.शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने उन्हाळी आवर्तन, शेतकऱ्यांमध्ये समाधान. | C24Taas |


नेवासा - राज्याचे जलसंधारण मंत्री व नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने उन्हाळी आवर्तन सोडल्याने नेवासा तालुक्यातील खडका परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून शेतकरी पाणीदार आमदार अशी ओळख असणाऱ्या नामदार शंकरराव गडाख यांना धन्यवाद देतांना दिसत आहे
खडका सिंचन शाखेचे अंतर्गत सर्व पाणी वापर संस्थानी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे आम्हा शेतकऱ्यांना वेळेवर पाणी आणी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून मिळावा व उन्हाळी रोटेशन त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी केली होती.यावेळी शेतकऱ्यांच्या या मागणीची तत्परतेने दखल घेत ना.गडाख यांनी या प्रकरणी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना टेलकडील भागाला तातडीने पाणी सोडण्याचे आदेश दिले.
त्यानुसार नेवासा उपविभागीय अभियंता राजगुरू, शाखा अभियंता श्रीमती गायकवाड,कालवा निरीक्षक शिरसाठ यांनी खडका सिंचन शाखाअंतर्गत सर्वच टेल कडील गावांना वेळेत आणी पुरेसा पाणी साठा देण्याचे योग्य नियोजन केले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असल्याचे शिवशक्ती सहकारी पाणी वापर संस्थेचे निवृत्ती थोपटे यांनी सांगितले

नामदार शंकरराव गडाख यांनी शेतकऱ्यांचा पाटपाणी व पाणीप्रश्न तातडीने सोडून उन्हाळी आवर्तन यशस्वी करुन वेळेवर पाणी दिल्याने पिकांना जीवदान मिळाले असून जनावरांना देखील ऐन उन्हाळ्यात प्यायला पाणी व चारा उपलब्ध झाले आहे.उन्हाळी आवर्तन सोडल्याबद्दल या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान कारक वातावरण असून ना. गडाख यांच्या योग्य नियोजन बद्ध कामामुळे मुळा धरणाचे पाटपाणी शेतकऱ्यांना वेळेवर मिळाल्याने व उन्हाळी आवर्तन यशस्वीकेल्याबद्दल ना.शंकरराव गडाख यांचे या भागातील शेतकरी अनिलराव ताके,बाळासाहेब भोरे,निवृत्ती थोपटे,मोहनराव शिरसाठ, रामभाऊ महाराज आढाव,ज्ञानेश्वर आढाव,रंगनाथ करांडे, संजय भांगे,ज्ञानेश्वर पवार, संभाजी भाण्गे,रमेश लोखंडे आदी शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे .

No comments:

Post a Comment