नेवासा - मोटारसायकल कंटेनरच्या अपघातात २ जण जागीच ठार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, May 29, 2020

नेवासा - मोटारसायकल कंटेनरच्या अपघातात २ जण जागीच ठार. | C24Taas |

नेवासा - मोटारसायकल कंटेनरच्या अपघातात २ जण जागीच ठार. | C24Taas |


नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने 2 जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
    या घटनेची समजलेली माहिती अशी आहे की औरंगाबाद कडे जाणारा कंटेनर MH21BH9147 ने  मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने या अपघातात आसाराम केशव पंडित वय 60 राहणार. अमळनेर तालुका गंगापूर. व जनार्धन लक्ष्मण बुट्टे वय 40 हे 2 जण अपघातात जागीच ठार झाले आहे.या अपघातात मयत झालेले दोघेही नातेवाईक असून ते कपाशीचे बियाणे घेण्यासाठी प्रवरासगम येथे आले होते. अशी माहिती मिळाली. ते घरी परत जाताना कंटेनरने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोघाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच प्रवरासंगम पोलीस मदत केंद्रातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक नागरगोजे, रेवननाथ मरकड, पोलीस कर्मचारी केवल रजपुत, काळे यांनी धाव घेतली. तर कंटेनरच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी काही अंतरावर कंटेनर पकडून चालकास ताब्यात घेतले आहे. चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यत सुरू होते.
C24 तास,शंकर नाबदे, नेवासा.

No comments:

Post a Comment