नेवासा येथील बल्लाळ परिवाराकडून पंतप्रधान सहायता निधीसाठी एक लाखाची मदत.
प्रतिकारशक्ती वाढीसाठी पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना होमिओपॅथी औषधांचे वाटप.
नेवासा - कोविड १९ पंतप्रधान सहायता निधीसाठी शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नेवासा येथील उदयकुमार बल्लाळ यांच्याकडून एक लाखाची मदत धनादेशाच्या रूपाने देण्यात आली.आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बल्लाळ यांनी नगरपंचायत कर्मचारी व पोलीस यांना अल्पोपहाराचे वाटप तर पत्रकारांसह इतरांना प्रतिकार शक्तिच्या वाढीसाठी होमिओपॅथी औषधांचे ही वाटप यावेळी केले.
सरकारी नोकरी केल्यानंतर बसून न रहाता सामाजिक कार्यात उदयकुमार बल्लाळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजूंना व हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना त्यांनी रविंद्र मुनोत यांनी राबविलेल्या मोफत किराणा व भाजीपाला किट वाटप उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला याच कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान कोविड १९ सहायता निधीसाठी एक लाख एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे त्यांचे चिरंजीव डॉक्टर स्वप्नील बल्लाळ यांनी व परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या कडे एक लाख एक हजार चा धनादेश उदयकुमार बल्लाळ व डॉ.स्वप्नील बल्लाळ यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला यावेळी रामभाऊ खंडाळे, देविदास साळुंके,श्री मोहिनीराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त जयंत देवचक्के,निरंजन डहाळे,डॉ.प्रणव जोशी,अमित देवचक्के,अजित नरुला उपस्थित होते.
उदयकुमार बल्लाळ यांनी त्यानंतर नगरपंचायत येथे जाऊन नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिकार शक्तीवर्धक आयुष मंत्रालयाच्या नियमानुसार आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधी जी कोरोना महामारीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करत आहे या
होमिओपॅथी औषधांचे वाटप यावेळी अल्पोपहार देऊन करण्यात आले.त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांसह पत्रकारांना या शक्तिवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल बल्लाळ परिवाराचे अनेकांनी अभिनंदन केले.
प्रतिकारशक्ती वाढीसाठी पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना होमिओपॅथी औषधांचे वाटप.
नेवासा - कोविड १९ पंतप्रधान सहायता निधीसाठी शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नेवासा येथील उदयकुमार बल्लाळ यांच्याकडून एक लाखाची मदत धनादेशाच्या रूपाने देण्यात आली.आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून बल्लाळ यांनी नगरपंचायत कर्मचारी व पोलीस यांना अल्पोपहाराचे वाटप तर पत्रकारांसह इतरांना प्रतिकार शक्तिच्या वाढीसाठी होमिओपॅथी औषधांचे ही वाटप यावेळी केले.
सरकारी नोकरी केल्यानंतर बसून न रहाता सामाजिक कार्यात उदयकुमार बल्लाळ यांनी सक्रिय सहभाग नोंदवला
कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजूंना व हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना त्यांनी रविंद्र मुनोत यांनी राबविलेल्या मोफत किराणा व भाजीपाला किट वाटप उपक्रमात हिरीरीने सहभाग घेतला याच कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान कोविड १९ सहायता निधीसाठी एक लाख एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचे त्यांचे चिरंजीव डॉक्टर स्वप्नील बल्लाळ यांनी व परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/EXYTrNII5WG6vceCJ1zAJd
उदयकुमार बल्लाळ यांनी त्यानंतर नगरपंचायत येथे जाऊन नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिकार शक्तीवर्धक आयुष मंत्रालयाच्या नियमानुसार आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधी जी कोरोना महामारीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करत आहे या
होमिओपॅथी औषधांचे वाटप यावेळी अल्पोपहार देऊन करण्यात आले.त्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांसह पत्रकारांना या शक्तिवर्धक औषधांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल बल्लाळ परिवाराचे अनेकांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment