मुळाचे उन्हाळी आवर्तन उद्यापासून ; नामदार गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 10, 2020

मुळाचे उन्हाळी आवर्तन उद्यापासून ; नामदार गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. | C24Taas |

मुळाचे उन्हाळी आवर्तन उद्यापासून ; नामदार गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक. | C24Taas |

नेवासा -  मुळाच्या उजव्या कालव्यातून (दि 11 मे ) पासून उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय नगर येथील बैठकीत झाला .याच अवर्तनाला जोडून नवीन आवर्तन सोडले जाईल . जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे , खासदार सुजय विखे , आमदार मोनिकताई राजळे , कार्यकारी अभियंता किरण देशमुख , माजी आमदार पांडुरंग अभंग उपस्थिती होते .

नेवासा तालुक्यातील बातम्यांसाठी WhatsApp group जॉईन करा 👉 https://chat.whatsapp.com/CkDtVnAGxhGEjWiTyPd4ue

या बैठकित गेल्या अवर्तनाचा आढावा घेण्यात आला मागील आवर्तन सुमारे 50 दिवस चालले 6450 दश लक्ष घनफुट पाणी वापर झाला या नवीन अवर्तनाला 4 टी एम सी पाणी धरणात पाणी शिलक असून त्यावरती हे आवर्तन चालणार आहे यात राहुरी , नेवासा , शेवगाव , पाथर्डी तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे . शेतकऱ्यांची यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होती, सर्वांना पाणी मिळावे, कुणीही वंचित राहू नये , पाण्याचा अपव्यय टाळावा याची बैठकीत चर्चा झाली .
विद्युत मोटारी बंद कराव्या , अनधिकृत उपसा कमी करण्यात यावा अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली . जागतिक मातृ दिन म्हणून जिल्ह्यातील तमाम मातांचे प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिकताई राजळे यांचा सन्मान करण्यात आला .


No comments:

Post a Comment