नेवासा - चर्च ऑफ जीजस क्राईस्ट च्या धर्मगुरूंकडून गरजू कुटुंबांना किरणा वाटप. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, May 9, 2020

नेवासा - चर्च ऑफ जीजस क्राईस्ट च्या धर्मगुरूंकडून गरजू कुटुंबांना किरणा वाटप.

नेवासा - चर्च ऑफ जीजस क्राईस्ट च्या धर्मगुरूंकडून गरजू कुटुंबांना किरणा वाटप.

नेवासा - कोरोना या विषाणूंच्या रोगाने जगात थैमान घातले असल्याने हातावरचे पोट असणाऱ्यांची फारच उपासमार होत आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता नेवासा फाटा येथील संभाजीनगर परिसरातील हातावरचे पोट असणाऱ्या सुमारे १५० कुटुंबाना किराणा वाटप करण्यात आले. नेवासा फाटा येथील चर्च ऑफ जीजस क्राईस्ट चे धर्मगुरू रेव्ह.सूर्या ब्रदर व त्यांच्या पत्नी सौ. मनीषाताई यांनी हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी धर्मगुरू रेव्ह. सुर्या ब्रदर म्हणाले की आतापर्यंत १५० गरजू कुटुंबाना किराणा साहित्य वाटप करण्यात आले असून आजून देखील १५० गरजू कुटुंबाना किराणा साहित्य वाटप करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सूर्या ब्रदर यांनी सांगितले. यावेळी वाटपासाठी श्री अनिल कुसळकर यांचे  मोलाचे सहकार्य लाभले.No comments:

Post a Comment