बीड प्रतिनिधी :बीड -येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज एक विवाह पार पडला असून पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी नवदांपत्यांना आशिर्वाद दिले.
औरंगाबादच्या प्रतिक्षा शामराव कोल्हे आणि बेलगाव (ता.केज) येथील प्रताप नरसिंग दातार यांचा आज विवाह निश्चित झालेला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी विवाहास प्रतिबंध घातलेला आहे. त्यामुळे विवाह कोठे करायचा? असा प्रश्न कोल्हे आणि दातार कुटुंबियांसमोर उभा होता. दोन्ही कुटुंबियांनी बीडमधील सामाजिक कार्यकर्ते के.के.वडमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या पुढाकारातून बीडमध्ये कोरोना रोखण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणार्या बीड पोलीस दलाचे प्रमुख अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या प्रमुख उपस्थित विवाह करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार हा विवाह अधीक्षकांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते के.के.वडमारे, जेष्ठ विधिज्ञ ऍड.बप्पा आवटे, पवन घुले, मयूर कुदळे, बंटी घुले यांच्यासह वधु कन्येच्या आई विजया शामराव कोल्हे, वर मुलाचे भाऊ विक्रम नरसिंग पवार यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही कुटुंबियांचे कौतूक करुन नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. दरम्यान, नोंदणी कार्यालयाऐवजी अधीक्षक कार्यालयात विवाह पार पडण्याचा कदाचित हा पहिलाच प्रकार असावा.
No comments:
Post a Comment