श्रीगोंदा प्रतिनिधी :राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या 'परिक्रमा' शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी कोरोना महामारी च्या काळात सोशल डिस्टन्ससिंग चे सर्व नियम पाळून समाजासाठी आपले योगदान दिले आहे व शासनाच्या आव्हाना नुसार पोलीस मित्र म्हणून महाविद्यालयामधील प्रथमेश वाळुंजकर, शुभम शेलार, संकेत दंडनाईक, प्रवीण महाडिक, ओंकार पोतदार, वैभव औटी या विद्यार्थ्यांनी ग्रामसुरक्षा कार्यात काम केल. या कार्यासोबतच ते लोकांमध्ये जनजागृतीचे देखील काम करत आहेत.यासोबतच अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी घरगुती मास्क बनवून सर्वसामान्य लोकांना ते उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये आदिती दराडे, रोहिणी चिर्के, प्रगती जगताप, विशाखा येणारे, शितल कुरुमकर, सुजाता खोमणे, नेहा भगत, प्रथमेश वाळुंजकर, संकेत दंडनाईक, राहुल गदादे या विद्यार्थ्यांनी 300 मास्कचे वाटप देखील केले आहे.अनेक विद्यार्थी आरोग्य सेवक म्हणून देखील काम करत आहेत त्यामध्ये स्वप्निल किर्तने, साठे महेश यासारख्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेवक म्हणून काम पाहिले. राहुल गदादे, गणेश देवकर, मोबीन बागवान, शेलार शुभम, प्रथमेश वाळुंजकर हे विद्यार्थी भाजीपाला पुरवठा व ज्येष्ठ नागरिक सेवा करण्याचे काम देखील करत आहे. लोकांना चांगल्या आरोग्यविषयक सवयी बद्दल माहिती देत आहेत. लोकांना सोशल डिस्टन्सचे महत्त्व पटवून देत आहेत आणि या कामाची दखल घेत श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस निरीक्षक माननीय दौलतराव जाधव साहेब यांनीदेखील या मुलांचे कौतुक केले आहे.
सामाजीक बांधिलकी जपून हे विद्यार्थी डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू), डॉ. प्रभाकर देसाई, डॉ. संतोष परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा धनंजय लांडगे, महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा जयदीप पवार तसेच प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांच्या मार्गदर्शनानुसार काम करत आहेत.
ह्या स्तुत्य उपक्रमाचे परिक्रमा संकुलाचे संचालक प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले असुन विद्यार्थ्यांना जी मदत लागेल ती देण्याचे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment