शिरुर - शिंदेवाडी येथील खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण कडून उघडकीस,२ आरोपी ताब्यात.! - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, May 10, 2020

शिरुर - शिंदेवाडी येथील खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण कडून उघडकीस,२ आरोपी ताब्यात.!

शिरुर - शिंदेवाडी येथील खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण कडून उघडकीस,२ आरोपी ताब्यात.!

 शिरुर - मलठणच्या शिंदेवाडी येथील खुनाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण कडून उघडकीस,दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे. मलठण ता. शिरूर येथिल उरळगाव हद्दीत  सापडलेल्या  मयत इसमाचा मृतदेह उरळगाव हद्दीत शीर नसलेल्या, धडाचे तुकडे केलेल्या स्थितीत आढळून आला होता. सदरचा  गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक संदीप पाटील सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक  जयंत मीना सो. मा. उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मा मॅडम यांनी गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना   पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांना दिल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक  पद्माकर घनवट सो यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, पोलीस उप निरीक्षक  अमोल गोरे, सहा. फौज. दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, दत्तात्रय तांबे,  पोलीस नाईक जनार्दन शेळके, गुरु जाधव, राजु मोमीन,  पोलीस कॉन्स्टेबल समाधान नाईकनवरे, अक्षय जावळे, शिरूर पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक जगदाळे पोलिस नाईक संजय जाधव यांचे पथक तयार करून तपास कामी रवाना केले होते. सदर पथकाने सर्वप्रथम गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता मयत इसमाचे नाव बापु तावजी शिंदे, रा. मलठन (ता शिरूर जिल्हा पुणे ) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नमूद पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय बातमीच्या आधारे जालिंदर सुखदेव थोरात, रा. वाघाळे, (ता. शिरूर, जिल्हा पुणे ) व हिरामण तुकाराम चोरमले, रा. उरळगाव (ता. शिरूर, जिल्हा पुणे) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता जालिंदर सुखदेव थोरात याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून त्याचे दाजी बापू शिंदे यांचा दृश्यम चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पुरावा मागे न ठेवता खून करण्याचा कट तयार केला व तयार केलेल्या कटाप्रमाणे बापू शिंदे यास मलठण येथून मासे आणायला जाण्याचा बहाणा करून उरळगाव येथील खून झालेल्या ठिकाणी नेले तेथे ठरल्याप्रमाणे दुसरा आरोपी हिरामण चोरमले हा कु-हाड घेऊन आला व त्या दोघांनी संगनमत करून बापू शिंदे यांचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे हात, पाय, पोट, कुऱ्हाडीने तोडून मृतदेह भीमा नदीच्या पात्रात टाकून दिले असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाप्रकारे कोणताही सुगावा मागे नसताना निर्घृण खुनाचा गुन्हा पथकाने उघडकीस आणल्यामुळे मा. पोलीस अधीक्षक संदीप पाटील सो यांनी पथकास बक्षीस जाहीर केले आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.
 प्रतिनिधी - अरुणकुमार मोटे, शिरूर

No comments:

Post a Comment